जिल्हा पालकमंत्र्यांकडून जगज्ज्योती बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
बसव जयंतीनिमित्त जिल्हा पालकमंत्री डॉ. एम. बी. पाटील यांनी सोमवारी सकाळी येथील बसवेश्वर चौकातील विश्वगुरु बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी बोलताना मंत्री म्हणाले की, विश्वगुरु बसवन्नांचा जन्म झालेल्या विजयपूर जिल्ह्यात त्यांची जयंती अर्थपूर्ण व भव्य स्वरूपात साजरी केली जात आहे. सर्व समाजातील लोक एकत्र येऊन हा उत्सव उत्साहात साजरा करत आहेत. बसवनबागेवाडी येथून बसव ज्योती यात्राही येत आहे, असे त्यांनी सांगितले.
संपूर्ण जगाला आपल्या वचनांद्वारे उत्कृष्ट संदेश देणारे बसवण्णा हे श्रेष्ठ तत्त्वज्ञ होते. त्यांची जन्मभूमी तसेच कर्मभूमी असलेल्या बसवकल्याणसह सर्व ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आनंद के., जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, महानगरपालिका आयुक्त विजय मेक्कळकी यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी, विविध समाजांचे नेते आणि नागरिक उपस्थित होते.
