Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

खासगी बस धडक दिल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

Responsive Ad Here


 खासगी बस धडक दिल्याने  पादचाऱ्याचा जागीच मृत्यू








विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपूर शहरात  रस्ते अपघात घडला असून एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील बसवेश्वर सर्कलपासून सेंट्रल बस स्टँडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ड्रीम लँड टॉकीजजवळ ही दुर्घटना घडली.

एका खाजगी बसने पादचाऱ्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिक नागरिक कडून माहिती गोळा करण्यात येत असून, पुढील तपासानंतर अधिक तपशील समोर येणार आहेत.

  अॅम्ब्युलन्स उशिरा पोहोचल्यामुळे घटनास्थळी उपस्थित लोकांनी संताप व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.