Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

तीव्र उष्णतेमुळे १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

Responsive Ad Here



तीव्र उष्णतेमुळे १५ वर्षीय मुलाचा मृत्यू







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे  

जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील तीव्र उष्णतेमुळे आजारी पडून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या  नळतवाड होबळी परिसरातील  इंगळगी-टक्कळकी गावातील १५ वर्षीय मुलगा श्रीशैल बसवंतप्प बिरादार याचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला.

  मृत मुलगा त्याच गावातील सरकारी शाळेत ७वी उत्तीर्ण होऊन ८वीत प्रवेश घेणार होता. खेळांमध्ये सक्रिय असलेला हा मुलगा उन्हात खेळताना उष्माघाताचा (हीट स्ट्रोक) बळी ठरला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.