Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मद्यधुंद व्यक्तीचा मोबाईल टॉवरवर चढून गोंधळ

Responsive Ad Here


मद्यधुंद व्यक्तीचा मोबाईल टॉवरवर चढून गोंधळ









विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कोट्याळ गावात एका मद्यधुंद व्यक्तीने मोबाईल टॉवरवर चढून गोंधळ घातल्याची घटना घडली असून श्रीशैल नावाच्या व्यक्तीने टॉवरवर चढून विचित्र वर्तन केले. तो मद्याचा व्यसनी असून गेल्या दोन वर्षांत त्याने दोन वेळा टॉवरवर चढून अशीच गोंधळाची कृती केली आहे.


श्रीशैल हा कोट्याळ गावचा रहिवासी असून, तो दारूसाठी वारंवार मोबाईल टॉवरवर चढून गोंधळ घालत असल्याचे सांगितले जाते. यावेळीही त्याने टॉवरवर चढून गोंधळ घातला. “मला दारू दिली तर मी खाली येतो,” असे तो म्हणत होता. अखेरीस तिकोटा पोलिसांनी समजूत काढून त्याला खाली उतरवले.