कुडगी एनटीपीसीच्या फ्लाय ॲशविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील कुडगी येथील उष्ण वीज प्रकल्पाजवळ शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
या उष्ण वीज प्रकल्पातील राख (फ्लाय ॲश) कृत्रिम तलावांमध्ये साठवली जाते.
नंतर त्या कृत्रिम तलावांतून ही फ्लाय ॲश इतर ठिकाणी वाहतूक केली जाते.
सध्या या कृत्रिम तलावांतून फ्लाय ॲश उडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या उडणाऱ्या राखेमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांवर परिणाम होऊन पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मसूती गावाजवळील कृत्रिम तलावांची शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
उघड्या टिपर वाहनांमधून फ्लाय ॲश वाहतूक थांबवून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
फ्लाय ॲशमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचेही शेतकऱ्यांचे आरोप आहे.
तसेच सुपीक जमिनीची माती खराब होत असून पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
फ्लाय ॲश वाहतूक करणाऱ्या टिपर चालक आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वादावादी सुद्धा झाली.
एनटीपीसी प्रकल्प उभारणीच्या वेळी, फ्लाय ॲशमुळे कोणतीही अडचण होणार नाही आणि तिचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते.
मात्र सध्या फ्लाय ॲशमुळे आणि तिच्या वाहतुकीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप आहे.
फ्लाय ॲश पिकांवर पडून हानी होत आहे.
उघड्या विहिरी तसेच भूजलावरही त्याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.
फ्लाय ॲश वाहतुकीचा ठेका घेतलेल्या कंत्राटदाराने निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आले.
शेतकऱ्यांची मागणी:
* फ्लाय ॲशचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करावे
* शेतजमिनीवर फ्लाय ॲश पडू नये
* वाहतूक फक्त बंद वाहनांमधून करावी
अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ही घटना कुडगी एनटीपीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
