कर्नाटक सौहार्द संघाच्या अध्यक्षपदी करजगी, उपाध्यक्ष पदी धन्याळ यांची बिनविरोध निवड
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
येथील कर्नाटक सौहार्द सहकारी संघाच्या पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी नबीलाल करजगी तर उपाध्यक्षपदी एस. एस. धन्याळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संघाच्या कार्यालयात झालेल्या या निवडणुक प्रक्रियेत संचालक मंडळाचे नूतन सदस्य अॅड एस. एस. जहागीरदार, नबीलाल शानवाले, रंगराव कुलकर्णी, हासनसाब निंबाळ, संजीवराव देशपांडे, दिपक पाटील, शशीधर भोवी, इरण्णा धोरी, हैदरसा निंबाळ, शब्बीर करजगी, श्रीमती पद्मावती कुलकर्णी, श्रीमती सुर्वणा मठ, अर्पिता कुलकर्णी, शैला हळ्ळी, रुकसाना करजगी, मुख्य व्यवस्थापकी आर. एस. दंदरगी उपस्थित होते.
याच प्रसंगी कर्नाटक राज्य सौहार्द सहकारी संस्था बैंगलोर च्या संचालक मंडळाचे नूतन सदस्य संजय पाटील कनमडी, विजयपूर सौहार्द सहकारी वक्कूटचे संचालक मंडळाचे सदस्य दिपक शिंत्रे, परशुराम चिंचली, जिल्हा युनियन अध्यक्ष एम. सी. मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला.
