Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर महानगरपालिका कडून कचरा तून खत तयार करण्याचा आदर्श उपक्रम

Responsive Ad Here



विजयपूर महानगरपालिका कडून कचरा तून खत तयार करण्याचा आदर्श उपक्रम








विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

काही दिवसांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन केंद्रात लागलेल्या आगीमुळे जवळच्या अनेक वसाहतींमध्ये धूर पसरून नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता आणि महानगरपालिकेविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. मात्र आता त्याच शहरात दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यातून उत्पन्न मिळवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आहे.

विजयपूर महानगरपालिका अधिकाऱ्यांचे हे काम खरोखरच आदर्शवत ठरत आहे. शहर झपाट्याने वाढत असून घराघरातून तसेच व्यावसायिक आस्थापनांतून कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. दररोज १३५ टनांपेक्षा अधिक ओला व सुका कचरा जमा होतो. हा कचरा घराघरातून वाहनांद्वारे गोळा करून शहराबाहेरील औद्योगिक परिसरातील कचरा प्रक्रिया केंद्रात नेला जातो, जिथे कामगार ओला आणि सुका कचरा वेगळा करतात.

  या कचऱ्याचा अपव्यय न करता त्यापासून महानगरपालिका उत्पन्न मिळवत आहे. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी एस. एल. लक्कण्णावर यांनी सांगितले की, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट आणि गांडूळखत तयार केले जाते. सुमारे ३० दिवसांत उच्च दर्जाचे खत तयार होते आणि ते प्रति किलो ६ रुपयांनी विकले जाते. तसेच हे खत महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने आणि रस्त्यांच्या मधील झाडांसाठीही वापरले जाते. शेतकरी आणि नागरिक हे कंपोस्ट व गांडूळखत खरेदी करत असून त्यामुळे महानगरपालिकेला उत्पन्न मिळत आहे.

  याशिवाय प्लास्टिक कचरा वेगळा करून सिमेंट कारखान्यांना दिला जातो. “कचऱ्यातून संपत्ती” निर्माण करण्याच्या या उपक्रमामुळे विजयपूर महानगरपालिकेला उत्पन्न मिळत असून पर्यावरणपूरक पद्धतीने झाडांसाठी खतही उपलब्ध होत आहे. महानगरपालिकेच्या या अभिनव प्रयोगाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

 एकूणच, विजयपूर शहरात जमा होणाऱ्या बहुतांश कचऱ्यापासून उत्तम दर्जाचे खत तयार केले जात असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.