Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

उल्हासराव वाघमोडे व संजय वाघमोडे या दोन्ही अधिकायांनी जपली सामाजिक बांधिलकी

Responsive Ad Here

  उल्हासराव वाघमोडे  व संजय वाघमोडे  या दोन्ही अधिकायांनी जपली सामाजिक बांधिलकी






     सातारा/ प्रतिनिधी-              

दोन्ही अधिकारी बधुनी समाजासमोर खुप मोठा आदर्श निर्माण केला, त्यांनी ज्या प्रमाणे हा निर्णय घेतला आहे तसाच निर्णय इतर अधिकारी यांनी घ्यावा व सामाजिक बांधिलकी जपावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे यांनी केले. कै जिजाबाई निवृत्ती वाघमोडे रा वाघमोडेवाडी ता माण जिल्हा सातारा यांचे प्रथम स्मृतिदिनानिमित्त डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी व महिलांना साडी वाटप कार्यक्रम शाहुवाडी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असणारे कळमतळी व अंबाईवाडा येथे ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले व ११५महिलाना साडी वाटप करण्यात आले. या साहित्य वाटप करणेचा शुभारंभ मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पटकारे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण काकडे म्हणाले की जिजाबाई वाघमोडे या नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व होते त्या शिक्षित होत्या काबाडकष्ट करून प्रपंचाचा गाडा हाकत कायमचा दुष्काळ अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण दिले अनिता या मुंबई महापालिका मोठ्या पदावर काम करत आहे दुसरी बहिण सुनीता ग्रॅज्युएशन केलं .  संजय वाघमोडे उपवनसंरक्षक कोल्हापूर व उल्हास हे भुमी अभिलेख अधिकारी मुंबई  आयुष्यात बदल संस्कार घडवण्याची किमया आईने केली आहे.

     शिक्षण नसतं तर  अधिकारी झाले नसतोम्हणून  आमच्या ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग समाजातील गोरगरीब डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी होण आवश्यक आहे म्हणून आम्ही इतर अनाठायी खर्च कमी करुन ५१००० रुपये चे साहित्य श्री प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांचे कडे दिले  शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही समाजात बदल घडवायचा असेल तर शिक्षण काळाची गरज आहे आम्ही नेहमीच आमच्या आईच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करणेचा उपक्रम सुरू ठेवला जाईल. असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पटकारे मुंबई चे सामाजिक कार्यकर्ते मारुती झोरे  काडवण चे नामदेव लांबोर विठ्ठल येडगे विठ्ठल गावडे सुशांत माळी अर्जुन चव्हाण उपस्थित होते