Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

श्री बसवेश्वर सौहार्द, संचालक मंडळाच्या सदस्यपदी डॉ. अमरनाथ देवगिरीकर यांची बिनविरोध निवड

Responsive Ad Here


श्री बसवेश्वर सौहार्द, संचालक मंडळाच्या सदस्यपदी डॉ. अमरनाथ देवगिरीकर यांची बिनविरोध निवड








 विजयपूर/ प्रतिनिधी  - दिपक शिंत्रे 

    येथील  श्री बसवेश्वर सौहार्द पत्तीन सहकारी संघाचा निवडणूकीत मागासवर्गीय अ मतदारसंघातून शहरातील प्रसिद्ध दंतवैद्य डॉ अमरनाथ शिवप्पा देवगिरीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

  विजयपूर भावसार क्षत्रिय समाज पंच मंडळाचे माजी सदस्य, सामाजिक, सहकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवप्पा देवगिरीकर यांचे सुपुत्र डॉ अमरनाथ देवगिरीकर हे रुग्ण सेवा करत असताना, सहकारी क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

 डॉ अमरनाथ यांना वैद्यकीय सेवे बरोबरच सहकारी क्षेत्रात सेवाकार्य करण्याची जी संधी मिळाली आहे, त्यात यश मिळो अशी शुभेच्छा अनेकांनी दिल्या आहेत. 

  त्याच प्रमाणे संघाच्या संचालक मंडळाच्या नूतन सदस्य म्हणून शंकरगौडा पाटील, विरण्णा जुगती, निंगणगौडा पाटील, भिमशी बिरादार, शरणू आलूर, सिद्धार्थ शिवशरण पाटील, महादेवप्पा पाटील, भोजप्पगौडा बिरादार, संगमेश पाटील, अनिता गुंदगी, रेणुका गोंज्याळ, शिवानंद रेबनाळ, मुन्नाजी पवार, शिवशरण सिंदगी यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक अधिकारी एस. डी. मनगोळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.