विजयपूर जिल्ह्यातील 5 पोलिस अधिकारी व कर्मचारांना मुख्यमंत्री पदक जाहीर
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कर्नाटक सरकारने 2025 सालासाठी मुख्यमंत्री पदकासाठी (Chief Minister’s Medal) एकूण 153 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड केली असून, विजयपूर जिल्ह्यातील पाच जणांना हा सन्मान मिळाला आहे.
पोलिस विभागातील त्यांच्या उत्कृष्ट सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि आदर्श कार्यक्षमतेची दखल घेऊन हा पदक जाहीर करण्यात आला आहे.
विजयपूर जिल्ह्यातून निवड झालेले अधिकारी:
* तुळजप्पा सुल्पी – डी.एस.पी, विजयपूर ग्रामीण उपविभाग
* बाळप्पा नंदगावी – डी.एस.पी, बसवण बागेवाडी उपविभाग
* श्रीकांत कांबळे – पोलिस सब-इन्स्पेक्टर, सिंदगी पोलिस ठाणे
* रामनगौडा बिरादार – सीपीसी 1708, मनगूळी पोलिस ठाणे
* चिदानंद गिडगंची – सीपीसी 1823, गांधीचौक पोलिस ठाणे
या कामगिरीमुळे जिल्ह्यातील पोलिस खात्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, निवड झालेल्या अधिकाऱ्यांवर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.
