रमजान निमित्त बाशापीर यंग कमिटीकडून इफ्तार पार्टी चे आयोजन
अक्कलकोट / प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर
तालुक्यातील सांगवी बु येथे बाशापिर यंग कमिटी यांच्याकडून रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर महमदखासीम शेख, अब्बास पटेल, जिलानी मुल्ला, तन्वीर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध समाजातील नागरिक सहभागी झाले असून यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर प्रतीक पाहायला मिळाले.
सायंकाळी रोजा सोडण्याच्या वेळी सर्व उपस्थितांनी एकत्र प्रार्थना करत जगभर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होणारे संकट टळावे, तसेच देशात शांतता व सलोखा कायम राहावा यासाठी अल्लाहकडे दुआ मागितली. त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा देत बंधुभावाचा संदेश दिला.
या कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्य, परस्पर आदर आणि सौहार्द यांचा संदेश समाजात पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इम्रान मुल्ला, मोहसीन जामदार, सद्दाम मुरशेद, अल्बक्ष मुल्ला, दाऊद मुल्ला, गौसपाक पठाण, इकबाल पठाण, आलम मुल्ला, फरहान पटेल, तोईद मुल्ला, सय्यद मुल्ला, अकबर शेख, दानिश पठाण, अल्लू शेख, इरफान शेख, नुरदिन पठाण, तुराब पठाण, महामूद बिचकुते, सुफियान बिचकुते आदींनी विशेष सहकार्य केले. सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
