इंडी शहरातील हॉटेलमध्ये आग – लाखो रुपयांचे नुकसान
विजयपूर /प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील इंडी शहरातील रेल्वे रोडवर असलेल्या पंचरत्न हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग रात्री लागली असून हॉटेलमधील मोठ्या प्रमाणातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समजते.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही घटना इंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
