दुधनी जि.प.शाळेत जागतिक महिला दिन जल्लोषात साजरा
दुधनी/ प्रतिनिधी
पूज्य महानंदाताई हिरेमठ मुगळी यांच्या दिव्य सान्निध्यात जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची व मुलांची शाळा दुधनी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन दुधनी नगर परिषदेचे नगरसेवीका व महिलां पालकांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी जि प प्राथ, कन्नड मुलींची शाळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ जयश्री विलास पोतदार व जि प प्राथ, कन्नड मुलांची शाळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ रेणुका राम सोनेगार दोघींनी भुषविले
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने सुरू झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजन व दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व उपस्थित महिला पालक दुधनी नगर परिषदेचे नगरसेविकाचें स्वागत करण्यात आले. मातांचे रांगोळी स्पर्धा, लिंबु चमचा,संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आली त्यात प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विजयी मातांना पूज्य महानंदाताई हिरेमठ संस्थान मठ मुगळी यांच्या हस्ते बहुमान देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी पूज्य महानंदाताई हिरेमठ यांनी एक स्त्री आपल्या मुला मुलींना कशा प्रकारचे संस्कार द्यावे याविषयी उत्कृष्ठ प्रकारचे अनमोल मार्गदर्शन केले.तसेच दुधनी नगर परिषदचे नूतन नगर सेवक
बसवराज रायप्पा हौदे,नगर सेवक रोप निंबाळकर,
गणपती पवार,सौ.सुनीता म्हेत्रे यांनी महिला दिनी मनोगत व्यक्त केले.यावेळी दुधानी चे नगराध्यक्ष
प्रथमेश म्हेत्रे,उप नगराध्यक्ष श्री.जिलानी नाकेदार नगर सेवक
रोप निंबाळकर,
सिद्धाराम येगदी,बसवराज हौदे, बसवराज बसवनकेरी,
बसवराज परमशेट्टी,श्री.संगमेश सिन्नूर,श
महांतेश पाटील,सौ.अंजना पाटील,सौ.संगीता पाटील, सौ.सुषमा धल्लू,सौ. माळेकर,सौ. मलम्मा धल्लू,सौ.मलम्मा कल्लूर सौ.अश्विनी रोडगे,सौ.हौदे व सर्व माता नारीशक्ति उपस्थित होते.कार्यक्रम सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक
दत्तात्रेय टोणगे,महादेव बासरगाव,
बसवराज कोळी, सिद्धाराम गोरे,बसवराज मंत्री, श्री खाजप्पा किणगी,सौ.सावित्री डोंगराजे,सौ.कलावती अरसगोंड, कु.मन्दाकिनी सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन
संताष जोगदे केले तर श्री.महादेव बासरगाव यांनी सर्वांचे आभार मानले.
