Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सभापती, उपसभापती सह भाजपाचे तालुक्याचे अध्यक्षचा ही पराभव- शंकर म्हेत्रे

Responsive Ad Here

 सभापती, उपसभापती सह भाजपाचे तालुक्याचे अध्यक्षचा ही  पराभव- शंकर म्हेत्रे 








अक्कलकोट/ प्रतिनिधी 


    नुकतेच झालेला पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातील नवनिर्वाचित चिन्ह व पक्ष "धनुष्यबाण "  (शिवसेना शिंदे गट)

भाजपाची वाट लावत आहे. 


 प्रथम दुधनी नगरपरिषदेवर एक हाती सत्ता स्थापन केली,  अक्कलकोट येथे एक नगरसेवक आता पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत तब्बल सहा जागेवर म्हेत्रे यांनी शिवसेनेची झेंडा फडकवली आहे. 

    कै. सातलिंगप्पा म्हेत्रे ते प्रथमेश म्हेत्रे  पर्यंत तिसर्या पिढीची परंपरेची राजकारण व जनतेतुन श्रध्दा जोपसताना दिसुन येत आहे. 


    दुधनी कृ.उ.बा.समितीचे सभापती, उपसभापती तसेच अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान भाजपाचे अध्यक्ष या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाले आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीत अक्कलकोटमध्ये शिवसेनेचे भगवा झेंडा फडकणार असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे यांनी मुलाखतीत सांगितले आहे.