Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

१८ फेब्रुवारी रोजी विजयपुर जिल्हा सौहार्द सहकारी समावेश

Responsive Ad Here



 १८ फेब्रुवारी  रोजी विजयपुर जिल्हा सौहार्द सहकारी समावेश









विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

  18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता शहरातील भावसार क्षत्रिय सांस्कृतिक भवन, बीएलडीई अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर, आनंद नगर, येथे  जिल्हा सौहार्द सहकारी समावेश आयोजित करण्यात आले असून  षण्मुखरुद मठ, विजयपुर आणि शांताश्रम, हुबळीचे पूज्य श्री अभिनव सिद्धारुड स्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात होणारा  या कार्यक्रमाचे जेष्ठ सहकारी, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे  

 अध्यक्षस्थान माननीय लोकसभा सदस्य  रमेश जिगजीनगी  हे भूषविणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार  यशवंतरायगौडा पाटील  

 ज्येष्ठ मार्गदर्शक  अरविंदजी देशपांडे आणि  रमेश वैद्यजी या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. 

राज्य सौहार्द संघाचे अध्यक्ष  नंजनगौडा आणि सहकारी भारतीचे अध्यक्ष  प्रभुदेवा मगनुर, भाजपा सहकार प्रकोष्ठचे राज्य संचालक एस दत्तात्रय,  माजी मंत्री  आप्पासाहेब पट्टणशेट्टी, माजी विधानसभा सदस्य  अरुण शहापुर , जिल्हा सहकारी खात्याच्या उपनिबंधक कु भाग्यश्री कुंभर, सहकारी भारतीय पदाधिकारी व जिल्हा सहकारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

      या समावेशाचे आयोजन नवनिर्वाचित विजयपुर सौहार्द सहकारी संघाचे अध्यक्ष संजय पाटील (कनमडी), उपाध्यक्ष चंद्रशेखर कवठगी व संचालक मंडळाचे सदस्य अरुण वारद, सुरेश बिरादार, अरुण मठ, सिद्दू मल्लिकार्जुन मठ, भालचंद्र मुंजणे, आर.डी.कुलकर्णी, चंद्रशेखर पाटील, राजू हंचाटे, यमनप्पा सातिहाळ, मल्लकप्पा रोट्टी, मौनेश पत्तार , सतीश शिंत्रे, विवेकानंद शिरोळकर व सहकार भारतीय पदाधिकारी परशुराम चिंचली व दीपक शिंत्रे यांनी केले आहे.