Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू ; कुटुंबीयांचा आक्रोश

Responsive Ad Here



व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू ; कुटुंबीयांचा आक्रोश 








विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

सिंदगी शहरातील सोमपूर रोडवर असलेल्या वैष्णवी व्यसनमुक्ती केंद्राजवळ मृतदेह ठेवून कुटुंबीयांनी तीव्र आंदोलन केले. केंद्राचे मालक व कर्मचारीच हुच्चप्पाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

   मृत व्यक्तीचे नाव हुच्चप्पा डोणूर (वय 49) असे आहे. व्यसनमुक्ती उपचारासाठी वैष्णवी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात दाखल झालेल्या हुच्चप्पावर उपचाराच्या नावाखाली अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हुच्चप्पाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

   डिसेंबर महिन्यात हुच्चप्पा डोणूर यांना वैष्णवी समग्र व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्यावर गंभीर हल्ला करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी चार दिवसांपूर्वीच केंद्राविरोधात केला होता. या पार्श्वभूमीवर सिंदगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

  हे केंद्र देवरहिप्परगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल सिद्दू मुरुडी यांच्या पत्नीच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात येते. केंद्रात दाखल झाल्यानंतर हुच्चप्पाला कुटुंबीयांची भेट घेण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी चार दिवसांपूर्वी त्यांना केंद्रातून डिस्चार्ज करून घरी नेले.

   घरी आणल्यानंतर हुच्चप्पाच्या पायांवर, पाठीवर, मांड्यांवर व कंबरेखाली गंभीर जखमा आढळून आल्या. मारहाणीच्या खुणा दिसून आल्यानंतर कुटुंबीयांनी केंद्राच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी मारहाण केल्याचे नाकारले व कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.


त्यानंतर हुच्चप्पाला पुढील उपचारासाठी सिंदगी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी हुच्चप्पाचा मृतदेह व्यसनमुक्ती केंद्रासमोर ठेवून आंदोलन केले व केंद्राचे मालक व कर्मचारीच मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली.

  घटनेची माहिती मिळताच सिंदगीचे तहसीलदार करप्पा बेळी, पीएसआय आरिफ मुशापुरी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृताच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. ही घटना सिंदगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.