श्री अंबाभवानी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना वार्षिक उत्सव 27 तारखेला
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्हातील इंडी शहरातील श्री अंबाभवानी देवस्थानाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना वार्षिक उत्सव दि. 27 जानेवारी मंगळवार रोजी आयोजित करण्यात आले आहे.
त्या दिवशी सकाळी 6 वाजता सोलापूर, पंढरपूर व श्री क्षेत्र गाणगापूर येथील आचार्यांच्या हस्ते श्री देवीस महा अभिषेक, पुष्पांजलि, व महाआरती करण्यात येणार आहे.
सकाळी 9 वाजता विविध वाद्यवृंदासह, महिलांचा महा कुंभमेळा, व पालखीचा मिरवणूक काढण्यात येणार असून, त्या नंतर आयोजित कार्यक्रमात भावसार समाजातील ज्येष्ठ समाज बांधव, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या साधकांचा सत्कार करण्यात येणार असून त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. ह. भ. प प्रभाकर बुवा बोधले महाराज पंढरपूर यांच्या सानिध्यात होणारा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विजयपूर भावसार समाजाचे अध्यक्ष व महानगर पालिकेचे माजी उपमहापौर राजेश देवगिरी, सचिव व पत्रकार दिपक शिंत्रे उपस्थित राहणार असल्याचे मंदीर समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
