Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

महेश बाहेरमठ यांनी सुभाष परमशेट्टी वर केले अदखलपत्र गुन्हा

Responsive Ad Here

 महेश बाहेरमठ यांनी सुभाष परमशेट्टी वर केले अदखलपत्र गुन्हा 


 मजकुर हणमंत माळेकर यांना शिवीगाळ व दमदाटी - महेश बाहेरमठ 






दुधनी- शहरातील माजी काँग्रेस  नगरसेवक व माजी दुधनी कृ. उ. बा. समितीचे  असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष चंदणप्पा परमशेट्टी यांनी महेश शांतप्पा बाहेरमठ यांचे मजकुर ( मिस्त्री ) हणुमंत माळेकर यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे आरोप व अदखलपत्र गुन्हा दाखल महेश बाहेरमठ यांनी सुभाष परमशेट्टी यांच्या वर केले आहे. 


      सदर माहिती महेश शांतप्पा बाहेरमठ यांनी सोलापूर 24तास न्युज चॅनेल ला माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे की शांतलिंगेश्वर विरक्तमठ दुधनी यांचे भिंत व बाहेरमठ यांचे भिंत सामाईक असल्याचे  दि. 26/02/2018 मधील  करार पत्रात दुधनी श्री मठाधीश डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी  व महेश बाहेरमठ यांचे करार पत्र लिहिले असल्याचे सांगितले तसेच साक्षीदार म्हणून कै.सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रे व कै. शांतय्या  गुरय्या बाहेरमठ असल्याचे माहिती महेश बाहेरमठ सांगितले. 

    श्री मठाचे तक्रारदार  पंच सुभाष परमशेट्टी सोबत  सातलिंगप्पा परमशेट्टी, महांतेश पाटील, सिध्दाराम मल्लाड, सिध्दाराम येगदी आदी गावातील लोक उपस्थित होते मात्र सुभाष परमशेट्टी यांनी आमच्या श्री मठाचे तीन फुट जागा सोडून बांधकाम कर नाही तर....शिवीगाळ व धमकी माझा मजकुर हणुमंत माळेकर यांना दिले असल्याचे माहिती दिली. 

   सदरची भिंत श्री मठाचे व महेश बाहेरमठ यांचे सामाईकात असल्याचे पुरावे महेश बाहेरमठ यांनी  असल्याचे माहिती देखील सांगितले.आणि सदरील झालेला आरोप मी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा नोंद  झाल्याची  माहिती महेश बाहेरमठ यांनी सांगितले.