Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

शिक्षण प्रेमी डॉ. एस. ऐ. पुणेकर यांचे निधन

Responsive Ad Here


शिक्षण प्रेमी डॉ. एस. ऐ. पुणेकर यांचे निधन







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

  येथील नामवंत सिक्याब शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण प्रेमी डॉ. शमशुद्दीन ऐ. पुणेकर (वय 90) यांचे निधन झाले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, चार मुले असा परिवार आहे

विजयपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात ओळखले जाणारे डॉ. शम्शुद्दीन ए. पुणेकर यांच्या निधनाबद्दल  तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

 *अल्प परिचय*


सरकारी नोकरीचा त्याग करून, समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यं विशेषतः महिलांपर्यंत —गुणवत्तापूर्ण व परवडणारे शिक्षण पोहोचवण्याच्या ध्येयासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले.

  १९६९ मध्ये भाड्याच्या एका घरात मोजक्या विद्यार्थ्यांसह त्यांनी सायकॅब (Socio Economic Cultural Association of Bijapura – SECAB) या संस्थेची स्थापना केली.


त्यानंतर महिलांसाठी पीयूसी व पदवी महाविद्यालयांची सुरुवात करून, अविभाजित विजयपूर जिल्ह्यातील पहिले महिला महाविद्यालय स्थापन करण्याचा मान त्यांनी मिळवला.

  कालांतराने डिप्लोमासह २६ हून अधिक शैक्षणिक संस्थांचा भव्य वटवृक्ष त्यांनी उभा केला. अहंकाररहित व्यक्तिमत्त्व, धर्मनिरपेक्ष विचारसरणी आणि प्रसिद्धीपेक्षा कार्याला प्राधान्य देणारे जीवन ही त्यांची वैशिष्ट्ये होती.

  डॉ. पुणेकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी मी प्रार्थना करतो. असे जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील शोक संदेशात व्यक्त केले आहे.