Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

प्रथमेश म्हेत्रे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारले

Responsive Ad Here

 प्रथमेश म्हेत्रे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारले  


उपनगराध्यक्षपदी जिलानी नाकेदार 


स्वीकृत नगरसेवकपदी डाॅ. उदयकुमार म्हेत्रे व बसवराज हौदे 







अक्कलकोट/ प्रतिनिधी- विरभद्र पोतदार 


दुधनी नगरपरिषदेचे नुतन नगराध्यक्षपदी प्रथमेश शंकर म्हेत्रे यांनी पदभार मंगळवारी दुपारी चार वाजता स्विकारले तर उपनगराध्यक्षपदी मुस्लिम समाजातील जिलानी चांद नाकेदार यांना संधी देण्यात आली. 

     नगरपरिषदेचे निकाल लागल्यापासून ते आजपर्यंत तालुक्याचे लक्ष उपनगराध्यक्षपद कोणाला मिळेल याकडे लोकांची लक्ष वेधून राहिले होते. शिवसेना शिंदे गटाचे नेते सिध्दाराम म्हेत्रे यांनी मुस्लिम समाजला न्याय मिळवून देत जिलानी नाकेदार यांना उपनगराध्यक्ष पद सुपूर्द केले. आणि या ऐतिहासिक निर्णयाच्या विशेष स्वागत हिंदु व मुस्लिम समाजातील लोकांनी केले. 

   दुधनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांनी सर्व नुतन नगराध्यक्ष नगरसेवक व स्वीकृत नगरसेवकांना अधिकृत पदभार सुपूर्द केले. 

   या नंतर सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, कार्यकर्ते मिळुन शहरातील मुख्य देवस्थान ला मिरवणूक काढत देवदर्शन केले. सत्ता स्थापन झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून डाॅ. उदयकुमार मल्लीनाथ म्हेत्रे व बसवराज रायप्पा हौदे यांची निवड करण्यात आला. तसेच गटनेते पदी महांतेश पाटील यांची निवड झाली. 

     यावेळी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, वैशाली म्हेत्रे, शिवसेना  शहरप्रमुख गुरुशांत ढंगे, सिध्दाराम येगदी, गुलाब खैराट मल्लीनाथ म्हेत्रे, गुरुशांत हबशी, रोफ निंबाळकर, चांद नाकेदार, शिवकुमार हौदे, बसवराज गुरुभेट्टी, सचिन माळगे, सिध्दाराम खंडाळ आदी उपस्थित होते.