Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर होम-हवन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न

Responsive Ad Here



श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर होम-हवन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न







विजयपूर/ प्रतिनिधी-दिपक शिंत्रे 

श्री सिद्धेश्वर संस्थेच्या संक्रांती महोत्सवानिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर आज “होम-हवन” हा श्री सिद्धेश्वर जत्रेतील वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला. संक्रांती म्हणजे एकत्र राहणे, स्नेहभाव वाढवणे—या अर्थाने आज तिळगूळ (तीळ–गूळ) वाटप करून आपुलकी व मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यात आले.


श्री सिद्धेश्वर संस्थेच्यावतीने विजयपूर  शहर आमदार  बसनगौडा रा. पाटील (यत्नाळ) यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२.४५ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा “होम-हवन” कार्यक्रम श्रद्धा व भक्तीभावाने पार पडला. होमकुंडाची धार्मिक विधी-विधानांनी सजावट करण्यात आली होती. अर्घ्य, पाद्य, आचमन आदी विधींसह अभिषेक करण्यात आला.



चंदनाच्या लाकडांबरोबर तीळ व धान्यांनी सजवलेल्या कुंडात हावेरी जिल्ह्यातील पकिरय्या शास्त्री, सिद्धरामय्या शास्त्री, बसय्या शास्त्री तसेच बूदय्या हिरेमठ, षडाक्षरय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली होम-हवन विधी संपन्न झाले. त्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर उत्सवमूर्ती व नंदीकोलची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सं. गु. सज्जन, अध्यक्ष बसय्या एस. हिरेमठ, सचिव सदानंद देसाई, संयुक्त सचिव बी. एस. सुगूर, कोषाध्यक्ष शिवानंद नीला, जत्रा समितीचे गुरू एस. गच्छिनमठ, एस. एच. नाडगौड, डॉ. सुनील उकमणाळ, एम. एस. रुद्रगौडर, सायबण्णा भुवी, नागप्पा गुग्गरी, उमाकांत वनरोटी, बसवराज कोरी, सुधीर चिंचली, राजशेखर मगीमठ, राहुल जाधव, शिवरुद्र बागलकोट, प्रेमानंद बिरादार, एस. एम. पाटील बबलादी, रमेश हळ्ळद, श्रीमंत जंबगी, एम. एस. करडी, संतोषकुमार तळकेरी, बसवराज कंदगल्ल, ईरन्ना पाटील, महादेव जंगमशेट्टी, अमृत तोष्णीवाल, मलकप्पण्णा गाणिगेर, मल्लिकार्जुन हक्कापक्की, बसवराज बिरादार, अनिल सबरद, महादेव जंगमशेट्टी, श्रीशैल देवर, उमेश कोरी, प्रविण बिझरगी, विशाल धारवाडकर, सोमशेखर वाळी, प्रशांत चौधरी, वीरेश वाळी, दत्ता गोलांडे, चंद्रू चौधरी, साहेबगौड बसरकोड, ईरन्ना हिप्परगी, शंकर बन्नूर, चन्नप्पा डमागार, चंद्रकांत वंदाल, आनंदगौड पाटील, अरविंद जिरळीमठ, श्रीकांत संगोगी, ईरन्ना पाटील, वीरेश मुदकामठ, सिद्धय्या हिरेमठ, ईरय्या गणकुमारमठ, शिवानंदय्या हिरेमठ आदी मान्यवर व असंख्य भाविक उपस्थित होते.