खासगी शाळेची बसची धडक, एक जण जखमी
सीसीटीव्हीत दृश्य कैद
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
पेट्रोल पंप परिसरात खासगी शाळेच्या बसने पादचाऱ्यास धडक दिल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी–आलमट्टी रस्त्यावर घडली आहे. कोप्पळ येथील रहिवासी दुर्गप्पा दोड्डमणी हे या अपघातातून नशिबाने जीवंत बचावले आहेत.चालत असताना दुर्गप्पा यांच्यावर खासगी शाळेची बसने धडक दिली बसच्या खाली घसरत पुढे गेल्यावर सुदैवाने त्यांचा जीव वाचला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, जखमी दुर्गप्पा यांच्यावर बसवनबागेवाडी सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बसवनबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.दरम्यान, स्थानिक नागरिकांनी शाळेच्या वाहनांच्या अतिवेग आणि निष्काळजी वाहनचालना बाबत चिंता व्यक्त केली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
