Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

घरगुती सिलिंडरचा बेकायदेशीर वापर : अन्न विभागाचा छापा – साहित्य जप्त

Responsive Ad Here



घरगुती सिलिंडरचा बेकायदेशीर वापर : अन्न विभागाचा छापा – साहित्य जप्त







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपूर शहरातील गोल गुंबज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या जुन्या, पडक्या घरात घरगुती वापराच्या सिलिंडरच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या व्यावसायिक वापराचे सिलिंडर भरले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करूनछापा टाकला आणि ४१ घरगुती गॅस सिलिंडर, २१ व्यावसायिक गॅस सिलिंडर, एक मोटार यंत्र तसेच वजन काटा जप्त करण्यात आला आहे, 

या प्रकरणी गोल गुंबज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाप्याच्या वेळी अन्न निरीक्षक विजयकुमार गुमशेट्टी, गोल गुंबज पोलीस ठाण्याचे पीएसआय एम. डी. घोरी, एएसआय ए. ए. हादिमणी तसेच पोलीस कर्मचारी गोपाळ दासर, महादेव अडिहुडी, बी. बी. मखनापूर, कुश राठोड, मल्लिकार्जुन चावर, मौनेश नेलवासी आणि अप्पू कोट्याळ उपस्थित होते, अशी माहिती अन्न विभागाचे उपसंचालक विनयकुमार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.