Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

निष्ठा असल्यास सुसंस्कृत समाजनिर्मिती शक्य : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Responsive Ad Here



निष्ठा असल्यास सुसंस्कृत समाजनिर्मिती शक्य : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 सार्वजनिक क्षेत्रात निष्ठा आणि कळकळीने काम केल्यासच उत्तम समाजनिर्मिती शक्य होते, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

   विजयपूर जिल्ह्यातील लोणी येथे श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन विज्ञान भवनाच्या शिलान्यासप्रसंगी त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या, 

शिक्षण, पिण्याचे पाणी, रुग्णालय यांसारख्या विषयांवर राजकारण न केल्यासच सुसंस्कृत समाज घडू शकतो.  निःस्वार्थ भावनेने संस्था उभारल्या, असे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले.

  शिक्षणाला आपल्या जीवनात अपार महत्त्व आहे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे, ही इच्छा गरीब-श्रीमंत भेद न करता प्रत्येक पालकाच्या मनात असते. जिथे शिक्षण असते तिथे कीर्ती आणि संपत्ती मिळते. राज्याचे भविष्य, मुलांचे भविष्य आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या महनीय व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.


‘वाढणाऱ्या पिकाची ओळख अंकुरातच दिसते’ या म्हणीप्रमाणे सामाजिक निष्ठा व कळकळीने वयाच्या 27व्या वर्षी शिक्षण संस्था उभारणारे बी. एम. कोरे हे समाजासाठी आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले.

   महिलांच्या स्वावलंबनासाठी आमच्या सरकारने हमी योजना लागू केल्या आहेत.  त्या यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. महिलांना अधिक मदत मिळावी म्हणून गृहलक्ष्मी योजनेसह गृहलक्ष्मी बँकेची स्थापना केली आहे. बँकेचे सदस्य बनून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

   पालकांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी मुलांचीच असल्याचे सांगत, मुलांच्या भविष्यासाठी आमच्या मतदारसंघात मोठी पावले उचलली जात आहेत. ‘डिजिटल डिटॉक्स’ योजनेअंतर्गत रात्री 7 ते 9 या वेळेत मोबाईल व टीव्ही बंद ठेवून मुलांच्या अभ्यासाकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

   या कार्यक्रमाला बीदर येथील सिद्धारूढ आश्रमाचे श्री शिवकुमार स्वामी, आलूर सिद्धारूढ आश्रमाचे श्री शंकरानंद महास्वामी, मंत्री शिवानंद पाटील, आमदार विठ्ठल कटकदोंड, इंडीचे आमदार यशवंतगौडा पाटील, बालविकास अकॅडमीचे अध्यक्ष संगमेश बबलेश्वर, माजी विधान परिषद सदस्य अरुण शहापूर, डॉ. विजय कोरिशेट्टी, अक्कमहादेवी विद्यापीठ (विजयपूर) चे कुलपती व्ही. सी. नागठाण, वीरशैव महासभा विजयपूरचे जिल्हाध्यक्ष बी. एम. कोरे (सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष), डॉ. एम. एस. मदभावी, डॉ. व्ही. डी. आईहोळी, डॉ. एस. के. कोप्प, डॉ. संगमेश मेत्री, हासंपिर वाळीकार, जंबूनाथ कंच्याणी, डॉ. मल्लिकार्जुन उटगी, पंचप्पा कलबुर्गी, व्ही. डी. कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते.