अक्कलकोट चे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी सह 115 समाजसेवक व गुरुजणांचा स्वराज्य माहिती अधिकार संघटनेकडून सत्कार व सम्मान सोहळा संपन्न!
अक्कलकोट दि. 27 - स्वराज्य माहिती अधिकार संघटना जिल्हा सोलापूर आयोजित, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अक्कलकोटचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी सह सात नगरसेवक, लायन्स क्लब च्या अध्यक्षासह 42 पदाधिकारी, रोटरी क्लब च्या अध्यक्षासह 44 पदाधिकारी, आणि लायन्स पूर्व प्राथमिक शाळा व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सह 21 गुरुजन असे 115 समाजसेवकांचा आणि गुरुजणांचा त्यांच्या अमूल्य सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल शाल, सन्मान पत्र देऊन, मोत्याचा माळ घालून, गुलाबपुष्प देऊन सत्कार व गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलीत करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित यांनी केले तर प्रास्ताविक मनोगत स्वराज्य चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत (दादा) वेदपाठक यांनी करत स्वराज्य संघटनेच्या कार्याचा आढावा सर्वासमोर ठेऊन उपस्थिताना स्वराज्य संघटनेत सामील होऊन समाजकार्य करण्याचे आवाहन केले.
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे, विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात यांच्या सूचनेनुसार आणि सर्व विश्वस्त, सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली 115 मान्यवरांचा गौरव व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अक्कलकोटच्या लायन्स प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वराज्य जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ,(दादा) वेदपाठक, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित, नूतन नगरसेवक महेश हिंडोळे, नगरसेविका सौ. शैला सचिन स्वामी, नगरसेवक नाविद डांगे, नगरसेवक प्रवीण शहा, नगरसेवक रमेश कापसे, नगरसेवक नन्नू कोरबू, नगरसेवक जाधव, न. प. शिक्षण मंडळाचे केंद्र समन्वयक गौरीशंकर कोळी, समन्वयक इस्माईल जमादार, मुख्याध्यापिका श्रीमती श्रीदेवी कापसे, लायन्स शाळेचे अध्यक्ष राजेंद्र हत्ते, रोटरीचे क्लबचे अध्यक्ष गुरुशांतप्पा पाटील, स्वराज्य चे अक्कलकोट शहर अध्यक्षा श्रीमती मिराबाई बुद्रुक, जिल्हा संघटक दिपक पोतदार, अक्कलकोट शहर कार्य. सदस्य काशिनाथ पोतदार, जिल्हा सचिव सुधाकर शहाणे, जिल्हा सरचिटणीस दिपक कुरुलकर, जिल्हा कार्य. सदस्य अमोल शहाणे, सह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.
