नवीन अपर जिल्हाधिकारी डॉ. औद्राम यांनी पदभार स्वीकारला
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
नवीन अपर जिल्हाधिकारी म्हणून डॉ. औद्राम यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. डॉ. औद्राम हे 2004 च्या बॅचचे केएएस अधिकारी असून, यापूर्वी त्यांनी विजयपूर महानगरपालिकेचे आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, नगरविकास प्राधिकरणाचे आयुक्त तसेच नगरविकास कक्षाचे योजना संचालक म्हणून जिल्ह्यात आपली सेवा बजावली आहे.
