Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

चित्त्याच्या उपद्रवामुळे ग्रामस्थ भयभीत

Responsive Ad Here

 चित्त्याच्या उपद्रवामुळे ग्रामस्थ भयभीत







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्हातील चडचण तालुक्यात चित्त्याच्या सततच्या उपद्रवामुळे तद्देवाडी, मरगूर, मनकंलगी, उमराणी व टाकळी या गावांतील नागरिकांमध्ये दिवसभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनकंलगी गावाच्या शेतात चित्त्याने एका महिलेवर झडप घालून तिच्या डोळ्याजवळ जखम केली असून, रविवारी व सोमवारी असे सलग दोन दिवस वन विभागाकडून चित्त्याला पकडण्यासाठी सतत कारवाई सुरू आहे.

  तद्देवाडी व मनकंलगी गावांच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून चित्त्याच्या हल्ल्यांत पाळीव प्राणी बळी पडत आहेत. एकामागून एक गायी, वासरे, शेळ्या व मेंढ्या चित्त्याने ठार केल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये तीव्र भीती पसरली आहे. पाळीव प्राण्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे लोक दहशतीखाली आहेत. चित्त्याला पकडण्यासाठी वन विभाग, हलसंगी गोळा (गवळी) समाजाची टीम, पोलीस विभाग व ग्रामस्थांचे सतत प्रयत्न सुरू असले तरी चित्ता नजरेआड होत आहे.

या कारवाईदरम्यान वन अधिकारी भाग्यवंत मसूधी, एस. जी. संगलक, मंजुनाथ धुळे, महसूल निरीक्षक गुरूशांत बिरादार, लोणी ग्रामपंचायतीचे पीडीओ सतीश बिरादार, ग्राम प्रशासकीय अधिकारी सी. एस. दत्ती, हलसंगी गवळी संघ, पशुसंवर्धन विभाग तसेच तद्देवाडी, मरगूर, मनकंलगी, उमराणी व टाकळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.




“चित्त्याचा शोध घेण्यासाठी विभागाकडून पुरेसे प्रयत्न सुरू आहेत. चित्ता दिसलेल्या ठिकाणाहून पळून जात आहे. आजूबाजूच्या परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली जात असून, लवकरच चित्त्याचा ठावठिकाणा लागेल. ग्रामस्थांनी चित्ता दिसताच त्वरित आमच्या निदर्शनास आणावे. जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.”

— *मल्लिनाथ कुसनाळ, वन अधिकारी, विजयपूर*


“गेल्या एक वर्षापासून चित्त्याने या भागातील लोकांची झोप उडवली आहे. पाळीव प्राणी व जनावरांवर सतत हल्ले होत असून, शेतात काम करण्यास शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. तद्देवाडी, मनकंलगी, उमराणी, टाकळी व मरगूर गावांतील ऊस तोडणीसाठी आमच्या जवळच्या साखर कारखान्यांना सूचना द्याव्यात, त्यामुळे चित्त्याचा शोध घेण्यास मदत होईल.”

— *नागनाथगौड बिरादार, कर्नाटक राज्य रैत उदय हरित सेना, राज्य उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष*