विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी दोन कुख्यात गुंडांना अटक
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या दोन कुख्यात गुंडांना गोलगुंबज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुंडा कायद्या अंतर्गत अटक केली आहे.
शहरातील बडिकमान रोड येथील रहान अहमदसाहेब अब्दुल अझीज अहमदी तसेच योगापूर कॉलनीतील सिद्धप्पा उर्फ सिद्दू श्यापेटी यांना अटक करण्यात आली आहे.
हे आरोपी विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असल्याने त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे व समाजातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडा कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २३ डिसेंबर २०२५ रोजी अटकेचे आदेश जारी केले होते
त्या आदेशानुसार दोन्ही गुंडांना अटक करून कलबुर्गी येथील केंद्रीय कारागृहात पाठविण्यात आले आहे.
