Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सोलापूर रोडवरील उडुपी कृष्णा पॅलेसला भिषण आग

Responsive Ad Here



  सोलापूर रोडवरील उडुपी कृष्णा पॅलेसला भिषण आग 








विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

शहरातील सोलापूर रोडवर असलेल्या उडुपी कृष्णा पॅलेसमध्ये भीषण आग लागण्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. तीन मजली असलेले हे हॉटेल पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, काही क्षणांतच हॉटेल जळून खाक झाल्याची स्थिती दिसून आली.


या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन केंद्राला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्याच्या कामात स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले.


प्राथमिक माहितीनुसार गॅस गळती किंवा विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज अद्याप मिळालेला नाही असून, पुढील तपास सुरू आहे.