Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

खून प्रकरणातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंड

Responsive Ad Here

 


खून प्रकरणातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंड










विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील कोरवार येथे झालेल्या भीमनगौड यांच्या खूनप्रकरणी सात  आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा 4थ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे.


घरासमोरील मोकळ्या जागेच्या वादामुळे त्यांचात सतत भांडण होत होते. 9-10-2013 रोजी हा वाद चिघळून भीमनगौड निंगनगौड पाटील, त्यांच्या भावांसह फिर्यादी शंकरगौड, निंगनगौड पाटील, शरणगौड, निंगनगौड पाटील, गुरुपादप्पगौड निंगनगौड पाटील या सर्वांचे शेजारी राहणारे दोन भाऊ—राजशेखर बापुगौड पाटील आणि त्यांची मुले वीरनगौड राजशेखरगौड पाटील, आनंदगौड राजशेखरगौड पाटील हे मोकळ्या जागेवर आपला हक्क असल्याचे सांगून  वाद घालत होते.

त्या जमिनीवर गुरुपादप्पगौड यांनी घर बांधण्यासाठी दगड व माती टाकली होती. 09-10-2013 रोजी आरोपी राजशेखरगौड पाटील आणि त्यांची मुले वीरनगौड व आनंदगौड हे तिघेही फिर्यादींच्या घराजवळ येऊन मोकळी जमीन आमची असल्याचे सांगत दगड-माती काढून टाका, नाहीतर परिणाम चांगला होणार नाही असे  धमकावून सांगितले 


त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 7.15 वाजता हेच आरोपी आपल्यासोबत हुन्सगी येथील चंद्रशेखर बसलिंगप्प कुंभार, शरणबसु रुद्रप्प सेवटी, मल्लिकार्जुन संगप्प अंगडी आणि बसवराज चंद्रशेखर याळगी यांना घेऊन आले. सर्वांनी मिळून हातातील लोखंडी रॉड व दांडक्यांनी भीमनगौड, फिर्यादी शंकरगौड आणि भावांना मारहाण करून गंभीर जखमी केले. भीमनगौड यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला व इतर जखमी झाले.

प्रकरणाची चौकशी पीएसआय अशोक चव्हाण यांनी केली. सीपीआय गंगाधरप्प यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

प्रकरणाची सुनावणी करताना 4थ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मुद्धेवेश दबेर यांनी सादर केलेल्या पुराव्यांचा अभ्यास करून, सातही आरोपी—राजशेखर बापुगौड पाटील, वीरनगौड राजशेखरगौड पाटील, आनंदगौड राजशेखरगौड पाटील, चंद्रशेखर बसलिंगप्प कुंभार, शरणबसु रुद्रप्प सेवटी, मल्लिकार्जुन संगप्प अंगडी आणि बसवराज चंद्रशेखर याळगी—यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचे घोषित केले.

त्यानुसार, या सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा  सुनावण्यात आली.

सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता व्ही. जी. हगरगुंड यांनी युक्तिवाद केला.