Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

श्रीगुरु राघवेन्द्र महास्वामींच्या मठात विविध धार्मिक कार्यक्रम

Responsive Ad Here


 श्रीगुरु राघवेन्द्र महास्वामींच्या मठात विविध धार्मिक कार्यक्रम 








विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 दिवटगेरी गल्ली येथील श्री गुरु राघवेन्द्र महास्वामींच्या मठाच्या ५० वसंतांच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम श्रद्धा-भक्तीपूर्वक पार पडले. उत्तरादी मठाधीश श्री सत्यात्मतीर्थ श्रीपादांनी श्रीमठास भेट देऊन रायरांच्या पवित्र ब्रुंदावनाला पंचामृत अभिषेक केला.त्यापूर्वी सकाळी ८ वाजता श्री सत्यात्मतीर्थ श्रीपाद यांचे पूर्ण कुंभाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर पंचामृत अभिषेक, हजारो भक्तांना मुद्राधारण, तसेच होमाची पूर्णाहुती अशी कार्यक्रममाला पार पडली. पुढे मूलरामदेवरांची पूजा, हजारो लोकांना तिर्थप्रसाद, फलमंत्राक्षत देऊन भक्तांना आशीर्वाद दिला.या प्रसंगी पं. मध्वाचार मोकाशी, संजीवाचार्य मदभावी, श्रीनिवास आचार्य गोठे, श्रीहरी गोलसंगी, श्रीनिवास बेटगेरी, विजय जोशी, कृष्णा गोनाळकर, कृष्णा कुलकर्णी, गोविंद देशपांडे, उपेंद्र देसाई, प्रविण मंकणी, अंबादास जोशी, श्रीपाद गायी, गोविंद जोशी, अजीत आचार्य हनगुंडी, विकास पदकी, राकेश कुलकर्णी, बिंदू माधव यडगीरी, संजू दिवानजी, ज्ञानेश कुलकर्णी, पवन जोशी आणि इतर अनेक उपस्थित होते.