Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

महाराष्ट्र बंगळुरू राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी तयार

Responsive Ad Here

 धाराशिवचा राज जाधव व सांगलीची सानिका चाफे महाराष्ट्राचे खो-खो कर्णधार

महाराष्ट्र बंगळुरू राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी तयार

कुमारांचे प्रशिक्षण शिबिर सोलापूरला, मुलींचे धाराशिवला










अहिल्यानगर (क्री. प्र.) - बाळ तोरसकर 

 राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील तेजस्वी कामगिरीच्या बळावर धाराशिवचा राज जाधव व सांगलीची सानिका चाफे यांची अनुक्रमे कुमार व मुली गटाच्या महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. येत्या ३१ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत बंगळुरू, कर्नाटक येथे होणाऱ्या ४४व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हे दोन्ही संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


ही निवड अहिल्यानगर येथे पार पडलेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून झालेल्या उत्तम कामगिरीचा परिणाम आहे. निवड समिती सदस्य श्रीनिवास मेतरी (रायगड), मनोज परदेशी (नंदुरबार), योगेश सोळसे (बीड) व राखी जोशी (पुणे) यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या संघाची घोषणा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केली.


स्पर्धापूर्व प्रशिक्षण – उच्च दर्जाची तयारी सुरू

राष्ट्रीय पातळीवरील कठोर स्पर्धेचा विचार करून कुमार गटाचे शिबिर २२ ते २९ डिसेंबर सोलापूर येथे तर मुली गटाचे शिबिर धाराशिव येथे आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही शिबिरातून संघाची रणनीती, फिटनेस व मनोधैर्य दृढ करण्यात येणार आहे.


महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू :

कुमार गट : राज जाधव – कर्णधार, जितेंद्र वसावे, हाराद्या वसावे, सोत्या वळवी, विशाल वसावे (सर्व धाराशिव), शंभूराज चंदनशिव, अरमान शेख, सिद्धार्थ माने-देशमुख (सर्व सोलापूर), श्री दळवी, पार्थ देवकाते (सर्व सांगली), श्री वसावे, आदेश पाटील (सर्व पुणे), तरबेज खान (सातारा), आशिष गौतम (ठाणे), ओमकार चव्हाण (अहिल्यानगर), राखीव : शंकर यादव (पुणे), समर्थ सावंत (मुं. उपनगर), लोकेश जाधव (सातारा), प्रशिक्षक : मोहन राजपूत (सोलापूर), सहा. प्रशिक्षक : सुजित माळी (लातूर), 

व्यवस्थापक : गणेश वारुळे (अहिल्यानगर)


मुली गट : सानिका चाफे – कर्णधार, श्रावणी तामखडे, विद्या तामखडे, सानिया सुतार (सर्व सांगली), धनश्री कंक, प्रणिती जगदाळे, दिक्षा काटेकर, श्रुती चोरमारे (सर्व ठाणे), मैथिली पवार, राही पाटील (सर्व धाराशिव), स्नेहा लामकाणे, प्राजक्ता बनसोडे (सर्व सोलापूर), निलम मोहंडकर (नाशिक), श्वेता नवले (पुणे), दिव्या पायले (रत्नागिरी), राखीव : कल्याणी लामकाणे (सोलापूर), सखुबाई चव्हाण (पुणे), सलोनी भोसले (सातारा), प्रशिक्षक : अभिजित पाटील (धाराशिव), सहा. प्रशिक्षक : ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी), व्यवस्थापिका : उज्वला चेमटे (अहिल्यानगर)


राज जाधव आणि सानिका चाफे यांची कर्णधारपदी निवड ही खेळाडूंच्या जिद्दीचा, सातत्याच्या मेहनतीचा आणि मजबूत प्रशिक्षण संस्कृतीचा विजय आहे. १४ वर्षाखालील (सब ज्युनिअर) गटातील  देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू साठीचा राज जाधव हा  भरत पुरस्कार प्राप्त आहे तर सानिका चाफे ही इला पुरस्कार प्राप्त आहे. राज्यातील ग्रामीण-पट्ट्यातील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर आपले नाव सोन्याच्या अक्षरांत लिहू लागले आहेत, ही महाराष्ट्र खो-खोच्या सुवर्णयुगाची चाहूल आहे. बंगळुरूमधील राष्ट्रीय स्पर्धा त्यांची खरी कसोटी, आणि महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची शान वाढविण्याची संधी ठरणार आहे.