विजयपूर जिल्हा कार्यरत पत्रकार संघाची निवडणूक जाहीर
जिल्हाध्यक्ष पत्रकार पदी अशोक यडहळ्ळी विजयी
विजयपूर/ प्रतिनिधी - दिपक शिंत्रे
कर्नाटक कार्यरत पत्रकार संघ विजयपूर जिल्हा अध्यक्षपदी टी.व्ही 9 चे जिल्हा प्रतिनिधी अशोक यडहळ्ळी हे विजयी झाले
९ नोव्हेंबर २०२५, रविवारी नवीन पत्रकार भवन येथे झालेल्या *कर्नाटक कार्यरत पत्रकार संघाच्या* जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर दुपारी ३.३० वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली.
या निवडणुकीत *टीव्ही ९ न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी अशोक यडहळ्ळी यांनी २६८ मते मिळवून विजय मिळवला असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी टी. के. मलगोंड यांनी जाहीर केले.
प्रतिस्पर्धी उमेदवार रविवाणी कन्नड प्रादेशिक दैनिकाचे संपादक सचेंद्र लंबू यांना ५३ मते मिळाली आहेत
एकूण ३६३ मतदार सदस्यांपैकी ३२५ सदस्यांनी मतदान केले, तर ४ मते अवैध ठरली.
अविरोध विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
राज्य कार्यकारिणी सदस्य पदासाठी: प्रकाश जी. बेण्णूर
जिल्हा सरचिटणीस पदासाठी इंदुशेखर सिद्दण्ण मणूर
*जिल्हा उपाध्यक्ष (३ पदे): बसवराज एस. उल्लागड्डी, मोहम्मद समीर एम. इनामदार, शशिकांत मेंडेगर
जिल्हा सचिव (३ पदे) सद्दाम हुसेन जमादार, अविनाश बी. बिदरी, विनोद सारवाड
*जिल्हा खजिनदार: राहुल डी. आपटे
जिल्हा कार्यकारिणी सदस्य (१५ पदे): एम.डी. इरफान शेख, विजयलक्ष्मी एम. अखंडप्पगोल, चिदंबर बी. कुलकर्णी, श्रीनिवास डी. सूरगोंड, पवन एम. कुलकर्णी, सुरेश सिद्दप्प तेरदाळ, शंकर एम. जळी, प्रभू कुमटगी, कल्लप्प शिवशरण, सुधींद्र एच. कुलकर्णी, संजय टी. कोळी, गोपाल जी. कणिमणी, गुरु राज गदनकेरी, यलगोंड एम. बेवनूर, शिवानंद डी. शिवशरण. अविरोध निवड झाली होती
असे जिल्हा निवडणूक अधिकारी टी. के. मलगोंड यांनी सांगितले.
मतदान अधिकारी आणि जिल्हा कामगार खात्याचे अधिकारी उमाश्री कोळी सहाय्यक निवडणूक अधिकारी वाय.बी. बिरादार आणि मतमोजणी अधिकारी रवी बिरादार यांनी मतदान प्रक्रिया पार पाडली, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी टी. के. मलगोंड यांनी दिली.
