अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशाच्या घरात चोरी — तिघांना अटक
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
*जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरातील हूडको कॉलनीत राहणाऱ्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशाच्या भाड्याच्या घरात २४ ऑगस्ट रोजी चोरी झाल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की सुनील राजपूत (२८), राहणार रामदुर्ग, बेळगाव जिल्हा
चेतन पांडू लमाणी (२८), नागनूर तामडा, रामदुर्ग जवळचा परिसर
राहुल परशुराम लमाणी, राहणार सवदत्ती यांना अटक करण्यात आली आहे
त्यांच्याकडून *२५० ग्रॅम सोन्याचे दागिने, ५० ग्रॅम चांदीचे दागिने, २ स्विफ्ट कार, २ मोटरसायकल्स आणि ४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
२४ ऑगस्ट रोजी या घरफोडीत आरोपींनी एकूण *₹ ३०,१४,५०० मूल्याचे सोनं व चांदीचे दागिने चोरून नेले होते. आता पोलिसांनी त्यांना अटक करून तपास पुढे नेला आहे.
