Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

चडचण शहरातील SBI बँकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना बांधून ठेवून पिस्तुलाचा धाक दाखवून धाडसी दरोडा

Responsive Ad Here



चडचण शहरातील SBI बँकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना बांधून ठेवून पिस्तुलाचा धाक दाखवून धाडसी दरोडा






विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

महाराष्ट्राच्या सीमेपासून जवळ असलेल्या *विजयपूर जिल्ह्यातील चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)* शाखेत *मंगळवार संध्याकाळी ७ वाजता सात ते आठ मुखवटा घातलेले दरोडेखोरांनी पिस्तूल आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून* धाडसी दरोडा टाकला आहे 

अंदाजे ₹८ कोटींची रोख रक्कम आणि सुमारे ५० किलो सोन्याचे दागिने** लुटल्याची माहिती बँकेतील कर्मचारी आणि पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही.

चडचण शहरातील *पंढरपूर मुख्य रस्त्यावर गजबजलेल्या भागात असलेली SBI शाखा कर्मचाऱ्यांनी काम संपवून घरी जाण्याच्या तयारीत असताना, मिलिटरी ड्रेस परिधान केलेले दरोडेखोर मुख्य दरवाज्यातून बँकेत प्रवेश करून, देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्र दाखवून व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना जीवाची धमकी* देत लूट केली.

 दरोडेखोरांनी लुटलेले *सोने आणि रोकड वाहने भरून महाराष्ट्राच्या दिशेने फरार झाले अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेनंतर *जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. तसेच, बँकेतील कर्मचाऱ्यांकडून तपशील गोळा केला जात आहे.

दरोड्याची बातमी कळताच हजारोंच्या संख्येने नागरिक बँकेसमोर जमा झाले होते.

पोलीस तपास वेगाने सुरू असून, राज्य आणि सीमेवर चौकशी वाढवण्यात आली आहे.