नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधनी येथे शैक्षणिक साहित्य वाटप
दुधनी- प्रतिनिधी- लक्ष्मीकांत पोतदार
दुधनी येथील जिल्हा परिषद शाळेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जि.प.प्राथ.मराठी कन्नड उर्दू शाळेतील 650 विद्यार्थ्यांना वह्या पेन सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी दुधनीतील प्रतिष्ठीत व्यापारी रामचंद्र पाटील, दुधनी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक महेश पाटील, प्रगतशील शेतकरी शंकर भांजी, प्रगतशील शेतकरी शिवराज गुळगोंडा तर महेश पाटील बोलतांना म्हणाले, श्री नरेंद्र मोदी यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे,एक निस्वार्थी भ्रष्टाचार मुक्त देशाचे एक पंतप्रधान म्हणून देशाला जगाला अभिमान आहे,अशा निष्कलंक पंतप्रधानाना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी दुधनी केंद्राचे केंद्र प्रमुख मधूकर गाडे, कन्नड मुले शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय टोणगे उर्दू शाळेचे फय्याज सुतार, पोमू राठोड, सिध्दरामेश्वर गोरे, श्रीशैल मलगण, रविकुमार कोरचगाव, महांतेश कर तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष जोगदे यांनी परिश्रम घेतले.शाळेच्या वतीने प्रमुख उपस्थित यांचे सत्कार करण्यात आले.
शेवटी संतोष जोगदे यांनी आभार मानले.