Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

प्रजापिता ब्रह्माकुमारी वतीने २६ पासून राष्ट्रीय पत्रकार संमेलनाचे आयोजन

Responsive Ad Here

 प्रजापिता ब्रह्माकुमारी वतीने २६ पासून राष्ट्रीय पत्रकार संमेलनाचे आयोजन








बेळगाव/ प्रतिनिधी- 

बेळगाव -  आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वशांती आणि सद्भभावना या ध्येयाने कार्य करीत असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने दिनांक 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान अबु रोड (राजस्थान) येथील शांतीवन येथे राष्ट्रीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 


प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, मीडिया विंग, राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पत्रकार संमेलनात,समाजात शांती सद्भावना एकता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात माध्यमांची भूमिका. या विषयांवर आधारित चर्चासत्रे परिसंवाद अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 26 रोजी सायंकाळी स्वागत सोहळा, दिनांक 27 रोजी सकाळी पत्रकार संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर सलग दोन दिवस विविध सत्रात चर्चासत्रे, मान्यवरांची व्याख्याने, ध्यान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम याचबरोबर, दिनांक 29 रोजी माउंट आबू दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनाला संपूर्ण देशासह नेपाळ येथील पत्रकार उपस्थित राहणार आहेत.