Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

अण्णिगेरी कुटुंबाने देहदानाचे वचन देत दिला समाजासमोर आदर्श

Responsive Ad Here



 अण्णिगेरी कुटुंबाने देहदानाचे वचन देत दिला समाजासमोर आदर्श








विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 शहरातील *सामाजिक कार्यकर्ते राघव अण्णिगेरी, त्यांच्या आई कमला अण्णिगेरी आणि पत्नी सौ.रचना अण्णिगेरीयांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी स्वेच्छेने बी.एल.डी.ई. वैद्यकीय महाविद्यालयास देहदान करण्याचे वचन देत एक प्रेरणादायक पाऊल उचलले आहे.

 ते म्हणाले की, दानांपैकी श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान, अवयवदान आणि देहदान , या संकल्पनेतून समाजात जनजागृती निर्माण करण्याचाही प्रयत्न आम्ही करत आहोत. रक्तदान आणि अवयवदान अनेक जीव वाचवू शकतात, पण मरणानंतर मनुष्याने आपले शरीर देहदानासाठी अर्पण केल्यास, भविष्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठा आधार मिळतो.

 अनेक पालक आपल्या मुलांना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहत असतात, पण दुर्दैवाने *देहदानासाठी पुढे येण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांना अभ्यासासाठी लागणाऱ्या मृतदेहांची कमतरता भासत आहे. ही एक मोठी समस्या बनली आहे. देशातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांना मृतदेह उपलब्ध न झाल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.राघव अण्णिगेरी यांनी स्पष्ट केले की, “हे आम्ही केवळ प्रसिद्धीसाठी करत नाही, तर समाजात जागरूकता निर्माण व्हावी, वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी, या एकमेव उद्देशाने आम्ही ही माहिती माध्यमांद्वारे सामायिक करत आहोत. यामुळे अधिक लोक देहदानासारख्या महत्त्वपूर्ण कार्यात सहभागी होतील, अशी आमची अपेक्षा आहे.”

  हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल आणि वैद्यकीय शिक्षणासाठी मार्ग सुलभ करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.