भीमा नदीच्या पुरात अडकलेल्या ८ जणांची यशस्वीरीत्या सुटका
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील *आलमेल तालुक्यातील तावरखेड गावात
पुरामुळे अडकलेल्या ८ जणांना *सिंदगी येथील अग्निशमन दलाच्या पथकाने बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवले आहे
शेजारच्या महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे**, भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे तावरखेड गावासह परिसरातील अनेक भागांना भीमेचे पाणी वेढून टाकले आहे.
अडकलेल्या सर्व नागरिकांना अग्निशमन कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने व धाडसाने वाचवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. दरम्यान, विजयपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे.
