Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर जिल्ह्यात पावसाचा कहर; भीमानदी काठी पूरस्थिती

Responsive Ad Here

 विजयपूर जिल्ह्यात पावसाचा कहर; भीमानदी काठी पूरस्थिती








विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजापूर – उष्णतेसाठी व दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजयपूर जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शनिवारी दिवसभर थांबला नाही, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने  विजयपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवून ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

   विजयपूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सिना नदीच्या पुराचे पाणी कमी झाल्यामुळे तीन दिवस बंद असलेला वाहनांचा वाहतूक मार्ग शुक्रवारी सायंकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. भीमा नदीकाठी पूरस्थिती वाढत असून, मागील दोन दिवसांपासून आलमेल तालुक्यातील तारापूर गाव बेटासारखे वेढले गेले आहे. पूरस्थितीत अडकलेल्या ५० हून अधिक नागरिकांना जवळच्या पुनर्वसन केंद्रातील काळजी केंद्रात हलवण्यात आले आहे.

नदीकाठी असलेली गावे – देवणगाव, तावरखेड, ब्याडगिहाळ, कुमसगी, शेंबेवाड, कड्लेवाड, शिरसगी – या गावांतील काही घरांना पुराचे पाणी वेढून टाकल्यामुळे ती जळमय झाली आहेत.