वृक्षथॉन हेरिटेज रन-2025*' *साठी टी. भूबालन यांना आमंत्रण; 10 किमी शर्यतीत सहभागी होणार
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
शहरात येत्या *डिसेंबर 7* रोजी होणाऱ्या *वृक्षथॉन हेरिटेज रन-2025* या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होण्याचे आमंत्रण *राज्य ई-गव्हर्नन्स विभागाचे नागरी सेवा वितरण संचालक टी. भूबालन यांना देण्यात आले असून, त्यांनी या आमंत्रणाला सहमती दर्शवली आहे.
*आज बुधवारी बंगळुरूमध्ये वृक्षथॉन हेरिटेज रन-2025* चे ब्रँड अॅम्बेसेडर आणि भारतीय रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण कातरकीआणि उद्योगमंत्री एम.बी.पाटील यांचं जनसंपर्क अधिकारी डॉ. महांतेश बिरादार यांनी टी. भूबालन यांची भेट घेऊन त्यांना या रनमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.
या वेळी बोलताना *टी. भूबालन म्हणाले, "बसवणाडूतील 'कोटी वृक्ष' अभियानाची यशोगाथा *न्यूयॉर्क टाइम्स*सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमात प्रसिद्ध होणे हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. विजयपूर जिल्हाधिकाऱ्याच्या नात्याने मी देखील या अभियानात थोडासा हातभार लावल्याचा मला आनंद आहे. मंत्री एम. बी. पाटील यांच्या स्वप्नातील या अभियानाला बसवणाडूने दिलेला प्रतिसाद संस्मरणीय आहे."
ते पुढे म्हणाले, "विजयपूर जिल्ह्यातील नागरिक जल, वृक्ष, शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत असलेल्या भावनिक आणि गंभीर जाणीवेचेच हे फलित आहे की या अभियानाने आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतले आहे. या वर्षीच्या *हेरिटेज रन* मध्ये मी स्वतः 10 किलोमीटरच्या धावण्यात सहभागी होणार असून, माझ्या सारख्या विचारसरणी असलेल्या धावपटूंनाही सहभागी होण्यासाठी मी आमंत्रण देणार असल्याचे सांगितले.