विजयपूर -सोलापूर रस्ता बंद
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
* गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सिना नदीवरील कोलेगाव व चांदणी धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे, विजयपूर-सोलापूर महामार्ग पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे.
मागील तीन-चार दिवसांपूर्वीही, हत्तूर येथे सिना नदीच्या पुरामुळे सोलापूर–विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आता पुन्हा अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
दक्षिण सोलापूरमधील पूरग्रस्त गावकरी घराची दुरुस्ती करण्यासाठी परत जाण्याची तयारी करत असतानाच, पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना तात्पुरत्या निवास (काळजी) केंद्रात जाऊन थांबण्याचे निर्देश दिले आहेत.
रविवारी रात्री सिना नदीतील पाण्याचा पातळी वाढताना दिसून आली. वडकबळ येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास पाण्याची पातळी 10.800 मीटरपर्यंत पोहोचली होती. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सोमवारी सकाळी सोलापूर–विजयपूर रस्त्याचा संपर्क बंद करण्यात आला.
**पर्यायी मार्ग:** सोलापूर–विजयपूर राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे, सध्या वाहनांची वाहतूक मंद्रूप, कामती, मोहोळ मार्गे वळवण्यात आली आहे.
