स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या वतीने जागतिक माहिती अधिकार दिन जिल्ह्याधिकारी कार्यालयात सत्कार करून साजरा
सोलापूर / प्रतिनिधी
28 सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून जिल्ह्याधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शासन, प्रशासन, निम्म शासकीय कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन करून त्या सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या. शासकीय कामात जनतेचा सहभाग वाढावा अश्या पद्धतीचे निवेदन देऊन महसूल चे दिनेश पारखे यांचा शाल, श्रीफळ, मोत्याचे हार देऊन सन्मान करण्यात आला.*
*स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.*
*स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे, विश्वस्त तथा प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात यांच्या निर्देशनुसार आणि विश्वस्त तथा राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश काशीकर, सर्व विश्वस्त, सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*
*या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, कार्याध्यक्ष सुनील पंडित, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रकुमार रघोजी, प्रभारी इफ्तेकार कामतीकर, शहर अध्यक्ष विनोद भोसले, जिल्हा सचिव सुधाकर शहाणे, जिल्हा सह सचिव दत्तगुरु वेदपाठक, वैकुंठ जडल, इम्तियाज बागवान, संतोष पोतदार, गजानन सोनार, नामदेव दिकोंडा, विद्याकुमार शेलार, अमर पारसवार, संतोष दीक्षित, पोपट घोडके, संतोष कुलकर्णी, मिराबाई बुद्रुक, अमोल शहाणे, दत्तात्रय दळवी, संतोष कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.*
*उपस्थित सदस्यातून एक लकी ड्रॉ काढण्यात आले, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांचे कडून विजेते सदस्य नामदेव दिकोंडा यांना भेट वस्तू देण्यात आले.*
