Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

चडचाण एसबीआय बँक दरोडा प्रकरण: 6.5 किलो सोनं आणि ₹41 लाख 4 हजार रोकड जप्त

Responsive Ad Here


चडचाण एसबीआय बँक दरोडा प्रकरण:

6.5 किलो सोनं आणि ₹41 लाख 4 हजार रोकड जप्त









विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण शहरातील एसबीआय बँकेवरील दरोडा प्रकरणाची चौकशी सुरु असून, प्राथमिक टप्प्यात 136 पॅकेट्समधील 6.5 किलो सोनं आणि ₹41 लाख 4 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. 

शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की,  मंगळवारी सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजेदरम्यान ही घटना घडली होती यामध्ये  एसबीआय बँकेतून सुमारे 398 पॅकेट्समधून 20 किलो सोनं आणि ₹1 कोटी 4 लाख रोकड चोरी करण्यात आली होती.त्याच दिवशी मंगळवारी रात्री महाराष्ट्रातील हुलजंती गावात दरोड्यात वापरलेल्या वाहनाचा अपघात झाला आणि स्थानिकांसोबत दरोडेखोरांची झटापट झाली. त्यावेळी दरोडेखोरांनी काही लोकांना धमकावून काही बॅग्स घेऊन दरोड्यात वापरलेलं वाहन सोडून पळ काढला होता पोलिसांनी रात्री उशिरा दरोड्याच्या वाहनाचा ताबा घेतला. त्यात 21 सोन्याचे पॅकेट्स आणि ₹ 1 लाख 3 हजार रोख  सापडले. मंगळवारी रात्रीपासून सोलापूर जिल्हा पोलीस आणि विजयपूर जिल्हा पोलीस यांनी हुलजंती गावाला पूर्णतः वेढा घातल्यामुळे, दरोडेखोरांना सुमारे 25 किलो वजनाची बॅग घेऊन पळणे शक्य झाले नाही त्यामुळे त्यांनी गावातील एका रिकाम्या घराच्या छपरावर तांदळाच्या पोत्यामध्ये सोनं आणि रोकड ठेवून पलायन केलं  घटनास्थळी तपास करत असताना गुरुवारी सायंकाळी  त्या छपरावरून 136 पॅकेट्समधून 6.5 किलो सोनं आणि ₹ 41 लाख 4 हजार रोकड हस्तगत करण्यात आली आहे, असं जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितलं.

दरोड्यात वापरलेलं वाहनसुद्धा चोरीचं असून, महाराष्ट्रातील मंगळवेढा येथे या वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे सोलापूर जिल्हा पोलीस आणि विजयपूर जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त सहकार्याने तपास वेगात सुरु आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

दरोडेखोरांना पकडण्यासाठी 8 विशेष तपास पथकं तयार करण्यात आली असून सर्व बाजूंनी तपास सुरु आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं

.पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासोबत अ‍ॅडिशनल एस.पी. रामनगौड हत्ती देखील उपस्थित होते.