Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

त्या ८४ कुटुंबियांना कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून द्यावे- भाजप नेत्यांची मागणी

Responsive Ad Here


त्या ८४ कुटुंबियांना कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून द्यावे- भाजप नेत्यांची मागणी 







विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

सिंदगी शहरातील ८४ कुटुंबांची घरे हटवून त्यांना बेघर करण्यात आले असून, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. या सर्व कुटुंबांना त्वरित कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

या प्रसंगी बोलताना गुरुलिंगप्पा अंगडी म्हणाले, गरीबांवर असा गदा प्रहार करणे योग्य नाही. हटविण्यापूर्वी त्यांना योग्य तो कायमस्वरूपी पर्याय न देता अचानक अशी कारवाई करणे अन्यायकारक आहे. हटविल्यानंतर हे गरीब लोक कुठे जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सिंदगी नगरपरिषदेच्या हद्दीतील वॉर्ड क्र. २३ मधील सर्वे नं. ८४२/१अ क्षेत्रफळ ४.०० एकर असलेल्या नगरपरिषदेच्या जमिनीवर, २००४ साली त्यावेळच्या आमदार, नगरपरिषद अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत सुमारे ८४ 

 कष्टकरी आणि गरीब कुटुंबांना हक्कपत्रे वितरित करून त्यांना घरबांधणीची परवानगी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यांनी नगरपरिषदेला नियमितपणे करही भरला होता.


मात्र २० वर्षांनंतर त्याच जमिनीतील २ एकर १० गुंठे क्षेत्र काढून या ८४ कुटुंबांना हटवण्यात आले आहे. हा प्रकार अन्यायकारक असून,  संबंधित सर्वे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज ही ८४ कुटुंबे रस्त्यावर आली आहेत, असा आरोप अंगडी यांनी केला.

या कारवाईमुळे सुमारे २.५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले असून, दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा प्रतिकूल परिणाम सामान्य जनतेच्या जीवनावर झाला आहे. हा विषय जिल्हा प्रशासन व सरकारने गांभीर्याने घेऊन त्वरित योग्य तो न्याय द्यावा व कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी भाजपचे चंद्रशेखर कवटगी, संजय पाटील कनमडी, शिवरुद्र बागलकोट, शंकरगौड पाटील, ईरन्ना रेवूर, शहराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक उमेश वंदाळ, साबू माश्याळ, मल्लम्मा जोगूर, भरत कोळी, बसवराज हळ्ळी, गेसुदराज इनामदार, शेखर बागलकोट, अश्वथ रेबिनाळ, राजेश तावसे, संतोष निंबर्गी, पापूसिंग राजपूत, विजय हिरेमठ, राजू बिरादार, अप्पू कुंभार, महेंद्र नायक, वकील डोळी आदी उपस्थित होते.