दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे च्या मुलांचा व मुलींचाही डॉजबॉल स्पर्धेतील संघ जिल्हास्तरावर प्रथम
रत्नागिरी/ प्रतिनिधी-
डेरवण येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत रत्नागिरी जिल्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे च्या मुलांचा व मुलींचा संघ जिल्हास्तरावर विजेता ठरला आहे.मुलांच्या संघात आरव अविनाश जाधव, श्रवण मनोज जाधव, शुभम विनोद जाधव, वेदांत सहदेव धातकर, रूद्र महेंद्र जाधव, रजनेश रविंद्र पावरी, प्रेम मोहन पवार, पूजन रमेश धातकर, तन्मय संजय सावंत, ऋग्वेद मोरेश्वर झर्वे, आर्यन सुदेश पवार, श्रेयस नरेश यादव यांचा समावेश होता.तर मुलींच्या संघात अक्षरा विनोद झर्वे, सई देवचंद्र पावरी, संजीवनी रमेश भुवड, श्रुतिका सुरेश निवेंडकर, वेदिका मनोहर डाफळे, निरजा प्रमोद पावरी, नंदिनी रविंद्र जाधव, धनश्री नारायण बळकटे, खुशी राजेंद्र आंबेरकर, आर्या विजय चौघुले, अन्वया निलेश पावरी, सुरभी बळीराम सुर्वे या सहभागी होत्या.या संघाला क्रीडा शिशिका ऋतुजा राजेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांचे प्रोत्साहन तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व सर्व स्टाफचे उत्तम सहकार्य लाभले. संघातील खेळाडूंचा व मार्गदर्शक शिक्षिकेचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.