Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर शहरातील इब्राहिमपूर रेल्वेस्थानकात सुसज्ज इमारतीसाठी रु १कोटी ५० लाख निधी मंजूर - खा. रमेश जिगजिनगी

Responsive Ad Here



विजयपूर शहरातील इब्राहिमपूर रेल्वेस्थानकात सुसज्ज इमारतीसाठी रु १कोटी ५० लाख निधी मंजूर - खा. रमेश जिगजिनगी 






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 विजयपूर शहरातील इब्राहिमपूर रेल्वे स्थानकात सुसज्ज इमारत उभारण्यासाठी अंदाजे 1.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच इमारतीचे बांधकाम कार्य सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार रमेश जिगजिणगी यांनी दिली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, विजयपूर शहरातील इब्राहिमपूर भागातील जनतेच्या सोयीसाठी रेल्वे स्थानक असावे या हेतूने तेव्हा स्थानक सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करून यश मिळवले होते. या इब्राहिमपूर रेल्वे स्थानकाच्या स्थापनेसाठी आणि विकासासाठी निवृत्त अभियंता शंकरगौड पाटील सवणहळ्ळी यांनी विशेष प्रयत्न केले होते. अजूनही ते इथे इमारतींचा विकास व इतर अनेक विकासकामांसाठी अनेकदा निवेदन देत आले आहेत.

या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन मी जनतेच्या सोयीसाठी इब्राहिमपूर भागातील प्रवासी हे इब्राहिमपूर रेल्वे स्थानकावरच अवलंबून आहेत. मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यास लागणारा वेळही वाचतो. आता इमारत बांधण्यासाठी पूरक असा दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच निधी वितरीत होऊन काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.