विहिरीत पडून ८ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
खेळायला गेल्यावर विहिरीत पडून ८ वर्षांची मुलगी मृत्युमुखी पडली तिच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र अखेर ते अपयशी ठरले. ही दुर्दैवी घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्याजवळील धनसिंग (मोनप्पा नगर) तांडा येथे घडली आहे.
आईसोबत शेळ्या राखताना, खेळता खेळता ८ वर्षांची अर्चना राठोड काल संध्याकाळी विहिरीत पडली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी रात्रभर प्रयत्न करून मुलीचे मृतदेह बाहेर काढले.
इंडी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.