दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचे ध्वजारोहन वाटदचे प्रसिद्ध आंबा व्यावसाईक उमेश रहाटे यांच्या हस्ते
सैतवडे / प्रतिनिधी
यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी श्री माद्रे, श्री चिकटे,श्री निवेकर आदी उपस्थित होते.गावातील प्रभात फेरीनंतर ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच सौ. उषा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य , कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर दि मॉडेल च्या कलादालनान विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली.तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तिरंगा प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी ना. उदय सामंत यांनी सुपुर्त केलेल्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच श्री विनोद पेढे यांनी प्रशालेस एक आकर्षक फलक भेट दिला.याप्रसंगी सरपंच सौ. उषा सावंत, उपसरपंच मुनाफ वागळे, माजी पंचायत समिती सभापती शरद चव्हाण, खंडाळा शिवसेनेचे विभाग प्रमुख बाबय कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य, बानू खलफे, मदिना लांबे, श्री अनिल जाधव, संस्थेचे पदाधिकारी श्री चिकटे व श्री माद्रे आदी उपस्थित होते. यावेळी शरद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व या विद्यालयाची चौफेर प्रगती पाहून कौतुकही केले.या कार्यक्रमाचे नियोजन इयता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केले.सर्वाचे स्वागत मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.