Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

शंकर म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोगनिदान शिबिर संपन्न

Responsive Ad Here

 


 शंकर म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत  सर्व रोगनिदान शिबिर संपन्न 







अक्कलकोट/ प्रतिनिधी- लक्ष्मीकांत पोतदार 


अक्कलकोट- 25 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे नेते दानशुर व्यक्तीमत्व असलेले शंकर म्हेत्रे यांचे वाढदिवस विविध उपक्रमातुन साजरा करण्यात आला. तसेच मंगळवारी शांभवी फाऊंडेशन दुधनीच्या वतीने मोफत सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आला होता. 

      या शिबिरात सुमारे सहाशेपेक्षा जास्त रुगणांनी उपचार करुन घेतले आहेत. यात रक्त-लघवी तपासणी, शुगर- बीपी, थाॅयराईड, कुष्ठरोग, त्वचारोग, ईसीजी, अस्थमा ई.अनेक रोगांची मोफत तपासणी करून रुगणांना मोफत इंजेक्शन, गोळ्या, मलम देऊन उपचार करण्यात आला. 

     या शिबिराचे उद्घाटन दुधनीचे श्रीमठाधीश श्री. म. नि. प्र. डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामी व माजी. सभापती प्रथमेश म्हेत्रे यांचे हस्ते करण्यात आला.

    या शिबिरात Secure Hospital Solapur चे डाॅ. चंद्रशेखर सालक्की, डाॅ. ऐश्वर्या सालक्की, डाॅ. शांभवी म्हेत्रे, दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विभुते, डाॅ.मुजावर, डाॅ. मंजुनाथ पाटील, कुष्ठरोग तज्ञ शरद कुलकर्णी, डाॅ. निखिल कांबळे, डाॅ. अपर्णा बंदीछोडे, डाॅ. सुप्रिया पवार, डाॅ. राजश्री लोखंडे,डाॅ. पटेल, डाॅ. S.कोंडे,  रुग्णवाहिका चालक विलास पोतदार, R.B.चौगुले, वर्षा भोसले, प्रतिक्षा टकपेरे,  आशा फुलारी, जय नाटेकर, विष्णू कराळे, अमोल टोनपे, सूर्यकांत बुवीनवाड तसेच गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा  म्हेत्रे प्रशाला चे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले.